Skip to main content

Posts

मध्यान्ह

Recent posts

शाळा

 शाळा शाळेच्या बाकावर फिरता का थरथरला हात सडा आठवणींचा का शहारला हृदयात? हा बंध कोणता आहे अन असे कोणते नाते मी कितीही मोठा होता मन लहान होऊन येते मन लहान होऊन येते इथे शोधण्या काही मीं इथे जसा सापडतो मी तसा कुठेही नाही ही वास्तू अजुनी सांगे अगणित अमुचे किस्से जरी सर्वांच्या हक्काची तरी कधी न होती हिस्से आठवते मज अजुनी ही गजबजलेली जागा इथे जोडला गेलेला हरेक अनोखा धागा त्या प्रार्थनेतले सूर ते गुरुजनांचे बोल साधेच येथले शब्द तरी अर्थ तयांचे खोल खेळाच्या मैदानावर घालवलेले तासन तास मैत्रीत वाटुनी खाल्लेला प्रत्येक खाऊचा घास ते शाळेमधले पंगे नाराजी भांडणे तक्रार तो आवाजातील जोर अन कधी खाल्लेला मार  ते भूगोलातले तारे नैऋत्य ईशान्य वारे त्या इतिहासातील गोष्टी अन गोष्टीतील लढणारे ती गणितातील प्रमेये आणि अवघडसे सिद्धांत ज्यांनी अमुच्या बुद्धीचा किती पाहिला अंत इंग्रजीच्या स्पेल्लिंग्सचे  लावलेले नवनवे शोध त्या मराठीतल्या कविता अन कवितेमधला बोध  ते चित्रकलेतील रंग अन हातातील कौशल्य माझ्या चित्रातील प्राणी कुणी न ओळखल्याच शल्य  ती ध्वजवंदनाची सकाळ   अन देशभक्तीपर गान  तो संचलनातील जोश अन उरातील अ

कॉपी -राईट?

कॉपी -राईट? अवघ्या काही लाईक्ससाठी त्यानं खरं लपवलं कोणा एकाच लेकरू आपल्या नावे खपवलं वठतंय पाहता खोटं पुन्हा पुन्हा गिरवलं परक्या प्रतिभेच देणं आपल्या माथी मिरवलं कौतुक पाहून मनात भलताच खुश झाला हे शेवटचं म्हणताना झाला एकच प्याला एकदा आत चुकचुकलं त्याने मनाला दटवलं जे जे मिळतं गेलं ते आपलं म्हणून गटवलं कळता कोणी विचारलं कोणी समजून चुकलं वाटलं ह्याला श्रेय आपलं मिळता मिळता हुकलं माणूस वाईट नसतो प्रतिभा असतें नेक बहरेल कशी बिचारी जर वृत्ती असेल फेक नजरेला नजर द्यायला असावं लागतं आपलं जे माझं म्हणून आपण जिकडे तिकडे छापलं क्षणात उतरतो माणूस स्वतःच्याही मनात लाख कबूल नाही केलं जरी कोणीही जनात इवलं असो,टिवलं असो भलं असो वा असो बुरं आपल्या प्रतिभेशी इमान हेच कलावंतातल खरं वेळ लागो बहरायला घडत चढत जाऊ आतून उमलून येता बहर डोळे भरून पाहू बहर डोळे भरून पाहू © कल्याणी बोरकर

झोका

जेव्हा जग भोवताली भासे सारे थांबलेले आणि मनीचे विचार दाही दिशा पांगलेले साद घालीत स्वतःला आठवाव्या आणा भाका थबकल्या आयुष्याला द्यावा एक तरी झोका तुला झोका द्यावयास कोणी येईल धावूनी कुणी हसेल मोठ्याने तुला पडता पाहूनी कधी भीतीने, लाजेने बघ चुकेलही ठोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका उंच असताना झोका राही पाय अधांतरी दोन्ही हातात धरावी तेव्हा घट्ट त्याची दोरी उंच झेपवण्याआधी नीट पारखावा धोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका त्याने पकडता लय होतो स्वतःशी संवाद जग भासेल नवीन येता अंतरीची साद हळूहळू अंतरात त्याचा रुजेलच ठेका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका झोका होई मागे पुढे देई आयुष्याचे धडे क्षण इथला टिपतो तोच जाई नभाकडे मग घेता घेता झोका येई देता एकमेका थबकल्या आयुष्याचा एक होऊया ना झोका? -कल्याणी बोरकर

खोलवर कवितासंग्रह प्रकाशन व अर्पण सोहळा

बाळंतपण

बाळंतपण ! बाळंतपण-आई होणं हा प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा , हळवा पण आनंद देणारा , तिचे सगळे जग बदलून टाकणारा अनुभव असतो.ह्या बाळंतपणावरची ही खट्टी मिठी कविता . नऊ मासाच्या प्रतिक्षेनंतर पाहिलं त्याचं मुख आई म्हणून अनुभवलं मी ते जगावेगळ सुख ते रडलं आणि मी हसले असा होता तो क्षण आई म्हणाली पूर्ण झाला बाळंतपणाचा पण वाटलं राजा राणीचा पूर्ण झाला आता संसार काव्यात वगैरे बोलायचे तर त्याला आली बहार पण दोनच दिवसात मांडलेलं सगळं गणित फसतं कळून चुकत आई होणं इतकं सोपं नसतं कित्ती दिले तरी अपुरेच पडतात त्याला चौवीस तास सेंट आणि deo कुठले नुसता ‘शी’ आणि ‘शु’ चा वास हक्काचं माहेरपण आईबाबांनी ठेवलेली बडदास्त सगळ्यांना हे बाळ गोड पण मला मात्र देत त्रास कधी लागते उचकी तर कधी धरत श्वास कधी बिनसतं पोट तर कधी होतो gas जेवण केलय आज आईने आवडीचे खास पण सूर ह्याने काढला की माझा अडकतोय घास त्यातच इकडून तिकडून सूचनांचा पाऊस हे करून बघ त्याला आणि हे नको खाऊस डोक बांधून घे जरा कित्ती आहे पाऊस दिवे लागणी झाली आता बाहेर

नजर

              डोळे, संपुर्ण व्यक्तिमत्वात लक्षात राहतात असे.डोळे खूप बोलतात आणि असे बोलतात जे  कधी कधी शब्दही सांगू शकत नाहीत.तशाच आशयाची एक कविता "नजर".खूप पाहिलेल्या नजरा आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा सांगणारी.                  नजर अशी एक नजर जिने केला कहर भाषा साऱ्या शरण आल्या करताना भाषांतर अशी एक नजर जिने केला कहर भिनत गेली अशी जसं भिनत जावं जहर अशी एक नजर जसा फुटे मायेस पाझर कोडग्या डोळा पाणी यावं दाटून यावा स्वर अशी एक नजर जिने केला कहर पाहता क्षणी गळून पडलं सारं एकवटलं बळ अशी एक नजर जिने केला कहर झाली नजरानजर दिसते तीच तिन्ही प्रहर अशी एक नजर जिने केला कहर मोहरून गेली स्वप्नं आला आयुष्याला बहर अशी एक नजर जिने केला कहर इतकी मिश्कील खट्याळ जशी विनोदाची लहर अशी एक नजर जिने केला कहर केविलवाणी,भुकेली मागते एक तुकडा भाकर अशी एक नजर जिने केला कहर अमानवी इतकी, काटा येई अंगावर अशी एक नजर जिने केला कहर करारी तेजस्वी सत्यवचनी प्रखर अशी एक नजर भिरभिरती चंचल न थारा आकाशी न टिके ती भुईवर अशी एक नजर जिने केला कहर नजरेतून मिळालं नेमकं हवं