Skip to main content

"नजर" पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने

     

    आज ही पोस्ट माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण आज "नजर" ह्या मराठी काव्यसंग्रहाची digital कॉपी प्रकाशित होतेय. हे पुस्तक Google play वर खाली दिलेल्या लिंक वर available आहे तसेच पुस्तकाची hard copy देखील उपलब्ध आहे.

नजर google play link. हार्ड कॉपी येथे उपलब्ध आहे किंवा amazon वर सुद्धा उपलब्ध आहे.

     आजपर्यंत ह्या blog वर वेळोवेळी अनेक कविता मी पोस्ट केल्या ज्याला खूप छान प्रतिसाद मिळाला हा काव्यप्रवास माझ्यासाठी खूप विशेष होता.खूप वेळा आपल्याया एखादी गोष्ट आवडते जी आपण profession म्हणून choose करतो असे नाही पण त्या छंदात, त्या कामात तुम्हाला जे समाधान मिळते ते बाकी सगळ्या पेक्षा मोठे असते.मलाही काही वर्षाच्या gap नंतर सुरु झालेला हा कवितांचा प्रवास खूप काही देऊन जात आहे.

       ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझ्यासाठी त्या कवितेत मांडायचा "विचार" कायम महत्वाचा होता, मग त्याला साजेसे शब्द आणि त्यातून फुलणारे काव्य हा अनुभव जितका आनंद देणारा होता, तितकाच अंतर्मुख करणारा होता.अनेकदा जी कविता सुचतेय  तो विचार सतत मनात असताना, तो विचार तुमचा ताबा घेतो तुम्हाला दुसरे काहीही सुचू देत नाही आणि स्वतः कडे आणि जगाकडे एका त्रयस्थ नजरेतून पाहायला शिकवतो.तसे पहायचे असेल तर तुम्हाला आधी तुमचे घट्ट पकडून ठेवलेले व्यक्तिमत्व सोडून थोडं मोकळे व्हावे लागते.तरच त्याची मजा अनुभवता येते आणि हाच भाग मला प्रचंड भावतो.Erol Ozan ह्या लेखकाने एका ठिकाणी म्हटलंय "Some beautiful paths can't be discovered without getting lost"

       ह्या पुस्तकाला "नजर" हे नाव दिलय कारण तोच अनुभव , प्रसंग प्रत्येकजण त्याच्या त्याच्या नजरेतून  पाहत असतो पण तो देखणा, संकुचित, हृदयस्पर्शी नक्की कसा आहे हे त्या त्या नजरेवर ठरतं. मी देखील ह्या पुस्तकात माझ्या नजरेतून पाहिलेले, कल्पनेत जगलेले अनेक क्षण काव्यरुपात मांडलेत.आणि नजरेच्या विविध छटा सांगणारी एक नजर नावाची कविता ही ह्या काव्यसंग्रहात आहे.




        हे पुस्तक तुम्ही नक्की वाचाआणि ह्या पुस्तकाबद्दल आपले अभिप्राय मला कळवा.



Comments

Popular posts from this blog

भेट

    गेले काही दिवस भेट म्हणजे भेटणं हा विषय डोक्यात होता कदाचित सध्या अशा छान गाठी-भेटी दुर्लभ झाल्या आहेत म्हणूनही असेल.मागच्या आठवड्यातील वीडियो मधे पण जी  मैत्री  ही कविताा सादर केली आहे त्यातही भेटीबद्दल  काही ओळी आहेत                                     "अपूर्णतेच्या त्या साऱ्या भेटींना द्यावे पूर्णतेचे देणे   अन भेटावे त्या साऱ्यांना ज्यांनी सुंदर होते जिणे"        ही कविता लिहिल्यावर तर भेट ह्या विषयावर थोडं लिहावंच असं वाटलं.भेटणं म्हणजे नक्की काय आणि आपण एकमेकाला भेटतो म्हणजे नक्की काय करतो आणि काही विशेष भेटीच मनात कायमच्या का कोरल्या जातात? तर अशा सगळ्या भेटी आठवत असताना एक गोष्ट जाणवते की कधी कधी भेट अविस्मरणीय होते, ती समाधान, आनंद देते, ती भेट पुढच्या कित्येक काळाकरता मनात अगदी कोरली जाते आणि अशी भेट पुन्हा पुन्हा व्हावी असे आपल्या सगळ्यांना वाटतं तर असं त्या भेटींमधे नक्कीच काहीतरी असतं ज्यामुळे ती तशी होते....

नजर

              डोळे, संपुर्ण व्यक्तिमत्वात लक्षात राहतात असे.डोळे खूप बोलतात आणि असे बोलतात जे  कधी कधी शब्दही सांगू शकत नाहीत.तशाच आशयाची एक कविता "नजर".खूप पाहिलेल्या नजरा आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा सांगणारी.                  नजर अशी एक नजर जिने केला कहर भाषा साऱ्या शरण आल्या करताना भाषांतर अशी एक नजर जिने केला कहर भिनत गेली अशी जसं भिनत जावं जहर अशी एक नजर जसा फुटे मायेस पाझर कोडग्या डोळा पाणी यावं दाटून यावा स्वर अशी एक नजर जिने केला कहर पाहता क्षणी गळून पडलं सारं एकवटलं बळ अशी एक नजर जिने केला कहर झाली नजरानजर दिसते तीच तिन्ही प्रहर अशी एक नजर जिने केला कहर मोहरून गेली स्वप्नं आला आयुष्याला बहर अशी एक नजर जिने केला कहर इतकी मिश्कील खट्याळ जशी विनोदाची लहर अशी एक नजर जिने केला कहर केविलवाणी,भुकेली मागते एक तुकडा भाकर अशी एक नजर जिने केला कहर अमानवी इतकी, काटा येई अंगावर अशी एक नजर जिने केला कहर करारी तेजस्वी सत्यवचनी प्रखर अशी...

झोका

जेव्हा जग भोवताली भासे सारे थांबलेले आणि मनीचे विचार दाही दिशा पांगलेले साद घालीत स्वतःला आठवाव्या आणा भाका थबकल्या आयुष्याला द्यावा एक तरी झोका तुला झोका द्यावयास कोणी येईल धावूनी कुणी हसेल मोठ्याने तुला पडता पाहूनी कधी भीतीने, लाजेने बघ चुकेलही ठोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका उंच असताना झोका राही पाय अधांतरी दोन्ही हातात धरावी तेव्हा घट्ट त्याची दोरी उंच झेपवण्याआधी नीट पारखावा धोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका त्याने पकडता लय होतो स्वतःशी संवाद जग भासेल नवीन येता अंतरीची साद हळूहळू अंतरात त्याचा रुजेलच ठेका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका झोका होई मागे पुढे देई आयुष्याचे धडे क्षण इथला टिपतो तोच जाई नभाकडे मग घेता घेता झोका येई देता एकमेका थबकल्या आयुष्याचा एक होऊया ना झोका? -कल्याणी बोरकर