डोळे, संपुर्ण व्यक्तिमत्वात लक्षात राहतात असे.डोळे खूप बोलतात आणि असे बोलतात जे कधी कधी शब्दही सांगू शकत नाहीत.तशाच आशयाची एक कविता "नजर".खूप पाहिलेल्या नजरा आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा सांगणारी. नजर अशी एक नजर जिने केला कहर भाषा साऱ्या शरण आल्या करताना भाषांतर अशी एक नजर जिने केला कहर भिनत गेली अशी जसं भिनत जावं जहर अशी एक नजर जसा फुटे मायेस पाझर कोडग्या डोळा पाणी यावं दाटून यावा स्वर अशी एक नजर जिने केला कहर पाहता क्षणी गळून पडलं सारं एकवटलं बळ अशी एक नजर जिने केला कहर झाली नजरानजर दिसते तीच तिन्ही प्रहर अशी एक नजर जिने केला कहर मोहरून गेली स्वप्नं आला आयुष्याला बहर अशी एक नजर जिने केला कहर इतकी मिश्कील खट्याळ जशी विनोदाची लहर अशी एक नजर जिने केला कहर केविलवाणी,भुकेली मागते एक तुकडा भाकर अशी एक नजर जिने केला कहर अमानवी इतकी, काटा येई अंगावर अशी एक नजर जिने केला कहर करारी तेजस्वी सत्यवचनी प्रखर अशी...