Skip to main content

Posts

Showing posts with the label बाळंतपण

बाळंतपण

बाळंतपण ! बाळंतपण-आई होणं हा प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा , हळवा पण आनंद देणारा , तिचे सगळे जग बदलून टाकणारा अनुभव असतो.ह्या बाळंतपणावरची ही खट्टी मिठी कविता . नऊ मासाच्या प्रतिक्षेनंतर पाहिलं त्याचं मुख आई म्हणून अनुभवलं मी ते जगावेगळ सुख ते रडलं आणि मी हसले असा होता तो क्षण आई म्हणाली पूर्ण झाला बाळंतपणाचा पण वाटलं राजा राणीचा पूर्ण झाला आता संसार काव्यात वगैरे बोलायचे तर त्याला आली बहार पण दोनच दिवसात मांडलेलं सगळं गणित फसतं कळून चुकत आई होणं इतकं सोपं नसतं कित्ती दिले तरी अपुरेच पडतात त्याला चौवीस तास सेंट आणि deo कुठले नुसता ‘शी’ आणि ‘शु’ चा वास हक्काचं माहेरपण आईबाबांनी ठेवलेली बडदास्त सगळ्यांना हे बाळ गोड पण मला मात्र देत त्रास कधी लागते उचकी तर कधी धरत श्वास कधी बिनसतं पोट तर कधी होतो gas जेवण केलय आज आईने आवडीचे खास पण सूर ह्याने काढला की माझा अडकतोय घास त्यातच इकडून तिकडून सूचनांचा पाऊस हे करून बघ त्याला आणि हे नको खाऊस डोक बांधून घे जरा कित्ती आहे पाऊस दिवे लागणी झाली आता बाहेर...