Skip to main content

Posts

Showing posts with the label मराठी कविता

पडू देऊ नकोस विसर

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!  आजच्या दिवशी मला थोड्या मागच्या पिढीतील, साधारण माझ्या आईच्या वयाच्या बायकांची खूप आठवण येते...आपली पिढी ही हवं तेवढच करणारी,तसे स्वतःचे कौतुक करून घेणारी, दिलखुलासपणे जगणारी, हवं ते मागून घेणारीआणि वाटलं ते सांगून मोकळी होणारी आहे. पण थोड्या मागच्या पिढीत अशा अनेक जणी आहेत ज्यांचे अख्ख आयुष्य घरासाठी गेलं तरी कौतुकाची साधी थापही त्यांना फारशी लाभली नाही...त्यांचे अस्तित्व वेगळं असे नव्हतच....पण त्यांची सोबत मात्र गृहीत धरलेली होती..कायमची. एकमेकाच्या सोबतीचा विसर न पडू देणारा संसार हाच मैत्रीपूर्ण असतो असे मला वाटतं...म्हणून आपल्या सोबतीची आठवण करून देणारी, मागच्या पिढीतील "तिची" ही कविता पुन्हा आजच्या दिवशी share करतेय... कशी वाटली नक्की सांगा.. पडू देऊ नकोस विसर  सरती वर्ष  कमी करतीलही नव्या नवलाईचा असर              पण गृहीत धरलेल्या माझ्या सोबतीचा पडू देऊ नको विसर आली होती जेव्हा नवखी नवरी म्हणून ह्या घरात माप ओलांडतानाच आपलं म्हटलं होतं  तिनं सारं दारात ...

"नजर" पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने

          आज ही पोस्ट माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण आज "नजर" ह्या मराठी काव्यसंग्रहाची digital कॉपी प्रकाशित होतेय. हे पुस्तक Google play वर खाली दिलेल्या लिंक वर available आहे तसेच पुस्तकाची hard copy देखील उपलब्ध आहे. नजर google play link . हार्ड कॉपी  येथे  उपलब्ध आहे किंवा amazon वर सुद्धा उपलब्ध आहे.      आजपर्यंत ह्या blog वर वेळोवेळी अनेक कविता मी पोस्ट केल्या ज्याला खूप छान प्रतिसाद मिळाला हा काव्यप्रवास माझ्यासाठी खूप विशेष होता.खूप वेळा आपल्याया एखादी गोष्ट आवडते जी आपण profession म्हणून choose करतो असे नाही पण त्या छंदात, त्या कामात तुम्हाला जे समाधान मिळते ते बाकी सगळ्या पेक्षा मोठे असते.मलाही काही वर्षाच्या gap नंतर सुरु झालेला हा कवितांचा प्रवास खूप काही देऊन जात आहे.        ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझ्यासाठी त्या कवितेत मांडायचा "विचार" कायम महत्वाचा होता, मग त्याला साजेसे शब्द आणि त्यातून फुलणारे काव्य हा अनुभव जितका आनंद देणारा होता, तितकाच अंतर्मुख करणारा होता.अनेकदा जी कविता सुच...