Skip to main content

Posts

Showing posts with the label मराठी

आजोबा

आजोबांच्या खोलीत आता धुकं..धुकं...धुकं... आजोबांचं जग सगळं मुकं...मुकं...मुकं.. .. ही मंगेश पाडगावकर यांची " नसलेल्या आजोबांची असलेली कविता " जेव्हा पहिल्यांदा वाचनात आली होती,  तेव्हाही कविता वाचता वाचता खूप भरून आले आणि असे कध्धी होऊ नये असे वाटले, आज ही गोष्ट खरी आहे आणि खरच खूप भरून आलंय.३१ जानेवारी २०२० ला आजोबांना म्हणजे माझ्या बाबांच्या  बाबांना ९२ व्या वर्षी  देवाज्ञा झाली आणि ह्या १२ दिवसात दोनदा रत्नागिरीला गेल्यावर कित्येक आठवणी मनात फेर धरत राहिल्या, सगळे बालपणच जणू परत जागं होऊन भोवताली दिसत होतं..लाडक्या आजोबांच्या काही आठवणी आज जमतील तशा मांडणार आहे. लहानपणी मी आमच्या घरच्या नातवंडांमध्ये सगळ्यात मोठी त्यामुळे आजोबांची सर्वात लाडकी नात  होते लाडाने ते मला कल्याण म्हणत असतं आणि मी दिसले की 'कल्याण करी रामराया' हे गाणं गुणगुणत, .त्यांची अतिशय  लाडकी लेक  म्हणजे  माझी आत्त्या 'वर्षा' जी ठाण्याला असते.... तिची त्यांना आठवण  येत असली की मलाच ते कधीकधी कल्याण ऐवजी  'वर्षाराणी' म्हणून हाक मारायचे आणि म्हणायचे 'अरे मला व...

पडू देऊ नकोस विसर

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!  आजच्या दिवशी मला थोड्या मागच्या पिढीतील, साधारण माझ्या आईच्या वयाच्या बायकांची खूप आठवण येते...आपली पिढी ही हवं तेवढच करणारी,तसे स्वतःचे कौतुक करून घेणारी, दिलखुलासपणे जगणारी, हवं ते मागून घेणारीआणि वाटलं ते सांगून मोकळी होणारी आहे. पण थोड्या मागच्या पिढीत अशा अनेक जणी आहेत ज्यांचे अख्ख आयुष्य घरासाठी गेलं तरी कौतुकाची साधी थापही त्यांना फारशी लाभली नाही...त्यांचे अस्तित्व वेगळं असे नव्हतच....पण त्यांची सोबत मात्र गृहीत धरलेली होती..कायमची. एकमेकाच्या सोबतीचा विसर न पडू देणारा संसार हाच मैत्रीपूर्ण असतो असे मला वाटतं...म्हणून आपल्या सोबतीची आठवण करून देणारी, मागच्या पिढीतील "तिची" ही कविता पुन्हा आजच्या दिवशी share करतेय... कशी वाटली नक्की सांगा.. पडू देऊ नकोस विसर  सरती वर्ष  कमी करतीलही नव्या नवलाईचा असर              पण गृहीत धरलेल्या माझ्या सोबतीचा पडू देऊ नको विसर आली होती जेव्हा नवखी नवरी म्हणून ह्या घरात माप ओलांडतानाच आपलं म्हटलं होतं  तिनं सारं दारात ...