Skip to main content

Posts

Showing posts from 2019

पडू देऊ नकोस विसर

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!  आजच्या दिवशी मला थोड्या मागच्या पिढीतील, साधारण माझ्या आईच्या वयाच्या बायकांची खूप आठवण येते...आपली पिढी ही हवं तेवढच करणारी,तसे स्वतःचे कौतुक करून घेणारी, दिलखुलासपणे जगणारी, हवं ते मागून घेणारीआणि वाटलं ते सांगून मोकळी होणारी आहे. पण थोड्या मागच्या पिढीत अशा अनेक जणी आहेत ज्यांचे अख्ख आयुष्य घरासाठी गेलं तरी कौतुकाची साधी थापही त्यांना फारशी लाभली नाही...त्यांचे अस्तित्व वेगळं असे नव्हतच....पण त्यांची सोबत मात्र गृहीत धरलेली होती..कायमची. एकमेकाच्या सोबतीचा विसर न पडू देणारा संसार हाच मैत्रीपूर्ण असतो असे मला वाटतं...म्हणून आपल्या सोबतीची आठवण करून देणारी, मागच्या पिढीतील "तिची" ही कविता पुन्हा आजच्या दिवशी share करतेय... कशी वाटली नक्की सांगा.. पडू देऊ नकोस विसर  सरती वर्ष  कमी करतीलही नव्या नवलाईचा असर              पण गृहीत धरलेल्या माझ्या सोबतीचा पडू देऊ नको विसर आली होती जेव्हा नवखी नवरी म्हणून ह्या घरात माप ओलांडतानाच आपलं म्हटलं होतं  तिनं सारं दारात होती तीही कोण्या घरची अतिलाडाची लेक पण आय