Skip to main content

Posts

Showing posts from May, 2023

मध्यान्ह

 मध्यान्ह अखेरीस एक परीघ पूर्ण होऊन जाई गमावण्यासारखं मग कुठे उरतं काही? ममत्वाचा सूर आणि अपेक्षांचा पूर क्षणामधे ज्याने काळीज होतं असे चूर कुणावरची माया अन कशावरचा हक्क पुन्हा पुन्हा ठेच लागून होणारं दुःख ह्या सगळ्याच्या बरंच पल्याड निघून जाता भरीव असं काही आता गवसू लागे हाता मध्यान्हीचा प्रवास म्हणजे आता नाही धक्के प्रगल्भतेच्या उजेडात कळती कोण सख्खे अल्लडपण मिरवलं तसाच अनुभव मिरवू आयुष्याचे धडे नव्या नजरेमधून गिरवू ©कल्याणी बोरकर #kalyanismusings #marathikavita

शाळा

 शाळा शाळेच्या बाकावर फिरता का थरथरला हात सडा आठवणींचा का शहारला हृदयात? हा बंध कोणता आहे अन असे कोणते नाते मी कितीही मोठा होता मन लहान होऊन येते मन लहान होऊन येते इथे शोधण्या काही मीं इथे जसा सापडतो मी तसा कुठेही नाही ही वास्तू अजुनी सांगे अगणित अमुचे किस्से जरी सर्वांच्या हक्काची तरी कधी न होती हिस्से आठवते मज अजुनी ही गजबजलेली जागा इथे जोडला गेलेला हरेक अनोखा धागा त्या प्रार्थनेतले सूर ते गुरुजनांचे बोल साधेच येथले शब्द तरी अर्थ तयांचे खोल खेळाच्या मैदानावर घालवलेले तासन तास मैत्रीत वाटुनी खाल्लेला प्रत्येक खाऊचा घास ते शाळेमधले पंगे नाराजी भांडणे तक्रार तो आवाजातील जोर अन कधी खाल्लेला मार  ते भूगोलातले तारे नैऋत्य ईशान्य वारे त्या इतिहासातील गोष्टी अन गोष्टीतील लढणारे ती गणितातील प्रमेये आणि अवघडसे सिद्धांत ज्यांनी अमुच्या बुद्धीचा किती पाहिला अंत इंग्रजीच्या स्पेल्लिंग्सचे  लावलेले नवनवे शोध त्या मराठीतल्या कविता अन कवितेमधला बोध  ते चित्रकलेतील रंग अन हातातील कौशल्य माझ्या चित्रातील प्राणी कुणी न ओळखल्याच शल्य  ती ध्वजवंदनाची सकाळ   अन देशभक्तीपर गान  तो संचलनातील जोश अन उरातील अ