Skip to main content

Posts

Showing posts from June, 2018

भेट

    गेले काही दिवस भेट म्हणजे भेटणं हा विषय डोक्यात होता कदाचित सध्या अशा छान गाठी-भेटी दुर्लभ झाल्या आहेत म्हणूनही असेल.मागच्या आठवड्यातील वीडियो मधे पण जी  मैत्री  ही कविताा सादर केली आहे त्यातही भेटीबद्दल  काही ओळी आहेत                                     "अपूर्णतेच्या त्या साऱ्या भेटींना द्यावे पूर्णतेचे देणे   अन भेटावे त्या साऱ्यांना ज्यांनी सुंदर होते जिणे"        ही कविता लिहिल्यावर तर भेट ह्या विषयावर थोडं लिहावंच असं वाटलं.भेटणं म्हणजे नक्की काय आणि आपण एकमेकाला भेटतो म्हणजे नक्की काय करतो आणि काही विशेष भेटीच मनात कायमच्या का कोरल्या जातात? तर अशा सगळ्या भेटी आठवत असताना एक गोष्ट जाणवते की कधी कधी भेट अविस्मरणीय होते, ती समाधान, आनंद देते, ती भेट पुढच्या कित्येक काळाकरता मनात अगदी कोरली जाते आणि अशी भेट पुन्हा पुन्हा व्हावी असे आपल्या सगळ्यांना वाटतं तर असं त्या भेटींमधे नक्कीच काहीतरी असतं ज्यामुळे ती तशी होते.        भेट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दोन माणसांनी एकमेकाला प्रत्यक्ष भेटणं..आता अशा कितीतरी भेटी आपण लहानपणापासून अनुभ