Skip to main content

कॉपी -राईट?




कॉपी -राईट?

अवघ्या काही लाईक्ससाठी
त्यानं खरं लपवलं
कोणा एकाच लेकरू
आपल्या नावे खपवलं

वठतंय पाहता खोटं
पुन्हा पुन्हा गिरवलं
परक्या प्रतिभेच देणं
आपल्या माथी मिरवलं

कौतुक पाहून मनात
भलताच खुश झाला
हे शेवटचं म्हणताना
झाला एकच प्याला

एकदा आत चुकचुकलं
त्याने मनाला दटवलं
जे जे मिळतं गेलं ते
आपलं म्हणून गटवलं

कळता कोणी विचारलं
कोणी समजून चुकलं
वाटलं ह्याला श्रेय आपलं
मिळता मिळता हुकलं

माणूस वाईट नसतो
प्रतिभा असतें नेक
बहरेल कशी बिचारी
जर वृत्ती असेल फेक

नजरेला नजर द्यायला
असावं लागतं आपलं
जे माझं म्हणून आपण
जिकडे तिकडे छापलं

क्षणात उतरतो माणूस
स्वतःच्याही मनात
लाख कबूल नाही केलं
जरी कोणीही जनात

इवलं असो,टिवलं असो
भलं असो वा असो बुरं
आपल्या प्रतिभेशी इमान
हेच कलावंतातल खरं

वेळ लागो बहरायला
घडत चढत जाऊ
आतून उमलून येता
बहर डोळे भरून पाहू
बहर डोळे भरून पाहू

© कल्याणी बोरकर

Comments

Popular posts from this blog

झोका

जेव्हा जग भोवताली भासे सारे थांबलेले आणि मनीचे विचार दाही दिशा पांगलेले साद घालीत स्वतःला आठवाव्या आणा भाका थबकल्या आयुष्याला द्यावा एक तरी झोका तुला झोका द्यावयास कोणी येईल धावूनी कुणी हसेल मोठ्याने तुला पडता पाहूनी कधी भीतीने, लाजेने बघ चुकेलही ठोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका उंच असताना झोका राही पाय अधांतरी दोन्ही हातात धरावी तेव्हा घट्ट त्याची दोरी उंच झेपवण्याआधी नीट पारखावा धोका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका त्याने पकडता लय होतो स्वतःशी संवाद जग भासेल नवीन येता अंतरीची साद हळूहळू अंतरात त्याचा रुजेलच ठेका थबकल्या आयुष्याला परी हवा एक झोका झोका होई मागे पुढे देई आयुष्याचे धडे क्षण इथला टिपतो तोच जाई नभाकडे मग घेता घेता झोका येई देता एकमेका थबकल्या आयुष्याचा एक होऊया ना झोका? -कल्याणी बोरकर

Warm welcome

Its a long time we are connected and I would like to thank each one you for your encouragement and support online as well as offline :) Its really a wonderful journey for me so far.Me and my husband Gaurish started a blog and then converted it into website www.prosperitynjoy.com four years back to express ourselves in our areas of interest and with the grace of God we are quite successful in running this blog over these years.We thought that, now the time has come to create different blogs for different interests, to invite more audience of similar interest and to discipline the website which has variety of content as of now. So I have created my own blog kalyanismusings.blogspot.com to express myself which will be part of our main website www.prosperitynjoy.com. In coming time I am going to share few reviews received on my book of Marathi poetry with you all along with my freshly penned poems. As a finance professional, I am also planning to post and discuss some financial

आजोबा

आजोबांच्या खोलीत आता धुकं..धुकं...धुकं... आजोबांचं जग सगळं मुकं...मुकं...मुकं.. .. ही मंगेश पाडगावकर यांची " नसलेल्या आजोबांची असलेली कविता " जेव्हा पहिल्यांदा वाचनात आली होती,  तेव्हाही कविता वाचता वाचता खूप भरून आले आणि असे कध्धी होऊ नये असे वाटले, आज ही गोष्ट खरी आहे आणि खरच खूप भरून आलंय.३१ जानेवारी २०२० ला आजोबांना म्हणजे माझ्या बाबांच्या  बाबांना ९२ व्या वर्षी  देवाज्ञा झाली आणि ह्या १२ दिवसात दोनदा रत्नागिरीला गेल्यावर कित्येक आठवणी मनात फेर धरत राहिल्या, सगळे बालपणच जणू परत जागं होऊन भोवताली दिसत होतं..लाडक्या आजोबांच्या काही आठवणी आज जमतील तशा मांडणार आहे. लहानपणी मी आमच्या घरच्या नातवंडांमध्ये सगळ्यात मोठी त्यामुळे आजोबांची सर्वात लाडकी नात  होते लाडाने ते मला कल्याण म्हणत असतं आणि मी दिसले की 'कल्याण करी रामराया' हे गाणं गुणगुणत, .त्यांची अतिशय  लाडकी लेक  म्हणजे  माझी आत्त्या 'वर्षा' जी ठाण्याला असते.... तिची त्यांना आठवण  येत असली की मलाच ते कधीकधी कल्याण ऐवजी  'वर्षाराणी' म्हणून हाक मारायचे आणि म्हणायचे 'अरे मला वाटले व